Dharashiv Rain : धाराशिवमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात, शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली ABP Majha
धाराशिव जिल्ह्यात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी हाहाकार निर्माण झाला होता. सकाळपासून ढगाळ वातावरण होते आणि त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. यामुळे धाराशिवकरांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला होता. विशेषतः विदर्भामध्ये पावसाचा अंदाज होता, तर मराठवाड्याच्या काही भागांमध्येही काही प्रमाणात पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. या अंदाजानुसार धाराशिवमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. आधीच पुरामुळे त्रस्त झालेल्या धाराशिवकरांना पुन्हा एकदा पावसाने दर्शन दिले आहे. दिवसभर पाऊस कसा राहतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.