Maharashtra Rain updates : पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भ... राज्यात कुठे किती पाऊस?
Maharashtra Rain updates : पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भ... राज्यात कुठे किती पाऊस?
मुंबई: राज्यात येत्या 48 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमधील शाळांना गुरूवारी सुट्टी जाहीर (School Closed Today) करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले आहेत. राज्यातील इतर भागातील परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन निर्णय घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच दहावी आणि बारावीचे उद्या होणारे पुरवणी पेपरही पुढे ढकलण्यात आली आहे.राज्यातील काही ठिकाणी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने 10वी व 12वीच्या उद्या होणारी पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 10वी चे पुढे ढकलण्यात आलेले पेपर 2 ऑगस्ट रोजी होतील तर 12 वीचे पेपर 11 ऑगस्ट रोजी होतील. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. आज मुंबई, ठाणे, कोकण आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मंगळवारी या ठिकाणच्या शाळा बंद ठेवण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.