Maharashtra Rain Updates : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी, कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Rain Updates : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी, कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस?
राज्यात आत्ता कुठे थंडीची चाहूल लागत असताना काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावलीये. मुंबईत आज पहाटेपासूनच विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. मुंबईतल्या काही भागात पहाटे झालेल्या पावसानं पाणीही साचलं . तसंच सिंधुदुर्गातही सलग दुसऱ्यादिवशी पावसानं हजेरी लावली. कुडाळ, कणकवली, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्या. या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू पिकांवरही परिणाम होण्याची चिन्ह आहेत. तर तिकडे साताऱ्यातील महाबळेश्वरमध्येही काल अवकाळी पावसानं हजेरी लावली. जवळपास अर्धा तास पडलेल्या पावसामुळे परिसरात गारव्यात आणखी वाढ झाली होती. तसंच पुढच्या ३ ते ४ तासांत मुंबई, ठाणे, रायगड आणि पुण्यात सोसायट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय.