Maharashtra Rain Update : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाऊस विश्रांती घेणार : ABP Majha
पावसाबद्दल अतिशय महत्त्वाची बातमी आहे. उद्यापासूून आठवडाभर पाऊस रजेवर जाणार असल्याचं भाकित हवामान खात्यानं वर्तवलं आहे. मुंबईसह राज्यात काही ठिकाणी हलक्या सरी बरसतील, मुसळधार पाऊस मात्र पडणार नाही, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. मॉन्सूनच्या वाऱ्यांचा पश्चिम -पूर्व कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकला आहे. दक्षिण छत्तीसगडावरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात पाऊस रजेवर जाणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं.