Maharashtra Rain: कोकण आणि मराठवाड्यात आज, उद्या पावसाचा अंदाज, पश्चिम महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता
कोकण आणि मराठवाड्यात आज आणि उद्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात पावसासह गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांचा कडकडाटांसह पाऊस होणार असल्यानं पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली तर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर भारतातील राजस्थान, गुजरात, झारखंड आणि मध्य प्रदेश या भागात गेल्या दीड महिन्यापासून तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. या भागातून महाराष्ट्राकडे उष्ण वारे वाहत आहेत. तर, दक्षिणेकडून महाराष्ट्राकडे दमट वारे वाहत आहेत. या वाऱ्यांमुळे राज्यात पावसाची स्थिती निर्माण झाल्याचं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.. दरम्यान मराठवाड्यात मात्र, तापमानाचा पारा चढाच राहणार आहे...