Maharashtra Rain Update : राज्यभरात पावसाची कोसळधार, मराठवाड्यात हाहा:कार, आजही अतिवृष्टीचा इशारा
Continues below advertisement
महाराष्ट्रावर सध्या आपत्तींचा वर्षाव होतोय. काल दिवसभरात राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची कोसळधार पाहायला मिळाली. मराठवाड्यात तर पावसानं हाहाःकार माजवलाय. मराठवाड्यात सुरु असलेल्या पावसामुळं 20 लाख हेक्टरहून अधिक जमिन पाण्याखाली आहे. तर आतापर्यंत पावसानं 35 जणांचा बळी घेतला आहे. आजही मराठवाड्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
Continues below advertisement