ABP News

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात भीषण जलसंकट; पेरण्या खोळंबल्या; शेतकऱ्यांची चिंता वाढली

Continues below advertisement

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात भीषण जलसंकट; पेरण्या खोळंबल्या; शेतकऱ्यांची चिंता वाढली सध्या राज्याच्या काही भागात चांगला पाऊस (Rain) पडत आहे. मात्र, काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची गरज आहे. बऱ्याच ठिकाणी पावसाअभावी शेतीची कामं देखीळ खोळंबल्याचं चित्र दिसत आहे. तर ज्या ठिकाणी चांगला पाऊस झालाय त्या ठिकाणी शेतीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. जाणून घेऊयात पावसाबद्दल सविस्तर माहिती.  या भागात आज पडणार मुसळधार पाऊस हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील बहुंताश भागात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज राज्यातील कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याला देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे जिल्ह्याला देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव या दोन जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram