Maharashtra Rain Update :राज्यातील धरणांत 36 टक्के पाणीसाठा,शेतीसह उद्योगांना पाणी कमी पडण्याची भीती

Continues below advertisement

सध्या राज्यात पावसाला सुरुवात व्हायला अजून महिनाभराचा अवकाश आहे; मात्र अद्यापही राज्यातील धरणांमध्ये जवळपास ३६ टक्के पाणीसाठा आहे. पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे केवळ २८.८३ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात या भागातील शेतीसह उद्योग-व्यवसायांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाहीये..राज्यातल्या एकूण ३००३ धरणांमध्ये मिळून ७८९ टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या उपलब्ध पाणीसाठ्याचं प्रमाण हे ३६.६४ टक्के इतकं आहे. तर गेल्यावर्षी याच तारखेला हा पाणीसाठा ३७.३९ टक्के इतका होता. राज्यात सर्वाधिक पाणीसाठा यंदा अमरावती विभागात असल्याचे दिसून येतंय. धरणांमधील पाणीसाठा आणि महापुराचा संबंध कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांतील महापुरावर राधानगरी, चांदोली आणि कोयना या तीन धरणांमधून होणाऱ्या विसर्गाचा प्रभाव पडतो. सध्याचा कडक उन्हाळा, पाण्याची वाढती मागणी आणि पाऊस लांबण्याची शक्यता या बाबी विचारात घेतल्या तर पावसाळ्यापूर्वी ही तीनही धरणे बन्यापैकी तळाला गेलेली दिसतील असा अंदाज जलसंपदा विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram