Maharashtra Rain Update:जोरदार सरींनी मुंबईकरांची वीकेंड सुरु कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा
हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पावसाचं पुनरागमन झालंय.. आज सकाळपासूनच मुंबई आणि परिसरात पावसाला सुरुवात झालेय... पुढील २४ तासांमध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या १० ते १२ दिवसांच्या उघडीपीनंतर राज्यात सर्वच ठिकाणी पावसाचं पुनरागमन झालंय. काल सांयकाळपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाला सुरुवात झालीये. आज या पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज आहेत.