Maharashtra Rain Superfast : तुमच्या जिल्ह्यातील पाऊस पाणी :25 जुलै 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Rain Superfast : तुमच्या जिल्ह्यातील पाऊस पाणी :25 जुलै 2024 : ABP Majha
राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. पुणे, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीत देखील पहाटेपासून पावसाने जोर धरला आहे. गेल्या काही तासांपासून पावसाच्या जोरदार सरी मुंबई शहर आणि उपनगर परिसराला झोडपून काढत आहेत. यामुळे आता मुंबईतील लोकलसेवेवर (Mumbai Local Train) देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Mumbai Rains : बोरिवलीहून वांद्राच्या दिशेने जाणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी वाहनांच्या लांबच लांब रांगा मुंबईत पहाटेपासूनच जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात देखील झाली आहे. अशातच या पावसाचा परिणाम जो आहे तो रेल्वे वाहतुकी सोबतच रस्ते वाहतुकीवर देखील झाला आहे. बोरिवलीहून वांद्रे च्या दिशेने जाणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मालाड,जोगेश्वरी,गोरेगाव,अंधेरी विलेपार्ले आणि सांताक्रुज पर्यंत ही वाहतूक कोंडी झाली असून यामुळे चाकरमान्यांना कामावर जाण्यास देखील उशीर होत आहे. सकाळची वेळ असल्यामुळे प्रत्येक जण आपल्या कामावर पोहोचण्यासाठी लगबग करत आहे मात्र वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांना कामावर पोचण्यास विलंब होत आहे.