Maharashtra Monsoon: विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पावसाची दमदार हजेरी, भातलावणीसह शेतीच्या कामांना वेग

Continues below advertisement

जवळपास ३ आठवडे ब्रेक घेतलेल्या पावसानं अखेर विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये हजेरी लावलीय. अकोला, परभणी, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पावसाच्या सरी बरसल्या. उपराजधानी नागपुरात काल विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. कधी जोरदार सरी तर कधी रिमझिम सरींनी हजेरी लावली. त्यामुळे नागपूरकरांची उकाड्यातून सुटका झाली आणि वातावरणातला गारवा अनुभवता आला. परभणी शहरासह सेलू, पाथरी, मानवत, जिंतूर, गंगाखेड, पूर्णा, पालम, सोनपेठ तालुक्यांमध्ये जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे पूर्णा पाटबंधारे विभागाकडून पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर तिकडे अकोल्यातल्या बहुतांश भागात पावसामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. भंडाऱ्यातही पावसानं दमदार कमबॅक केलाय. त्यामुळे भातलावणीच्या कामांनी वेग धरलाय. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळालाय. यवतमाळ तालुक्यातही पावसाच्या हजेरीनं बळीराजा सुखावलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram