Marathwada Rain : हा घ्या पंचनामा; सरकारला कोणते निकष हवेत? ओला दुष्काळ कधी जाहीर करणार? ABP Majha
Maharashtra Marathwada Rain Update : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह (Marathwada Rain Update) राज्यातील काही भागात तुफान पाऊस झाला. या पावसानं होत्याचं नव्हतं करुन टाकलं आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हजारो हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. काही ठिकाणी पिकं सडली आहेत तर सोयाबीन जागेवरच उगवत असल्याचं देखील समोर आलं आहे. या नुकसानीमुळं शेतकरी हवालदिल झाला असून सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे.
Tags :
Maharashtra Rain Updates Maharashtra Rain Solapur Mumbai Rain Marathwada Beed Jalna Marathwada Rain Maharashtra Rainfall Monsoon Updates Maharashtra Monsoon Maharashtra Weather Today Weather Live Weather Forecast Today Gulab Cyclone Weather Updates Today