Maharashtra Rain Update : राज्यात अनेक ठिकाणी पाऊस ; कोकणाला 'रेड अलर्ट' तर मुंबईला 'ऑरेंज अलर्ट'

महाराष्ट्रातील पुढील पाच दिवस सर्वत्र चांगला पाऊस बरसणार, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यात आज आणि उद्या कोकणाला रेड अलर्ट तर मुंबईला आजपासून पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. तर तिकडे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.  दरम्यान, दडी मारलेल्या पावसानं मागील 2-3 दिवसांपासून राज्यातल्या बहुतांश भागात चांगलीच हजेरी लावलीय. विदर्भातल्या यवतमाळ, वाशिम , बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यातील अनेक गावांना काल पावसानं झोडपलं.  तर तिकडे मराठवाड्यातील नांदेड, परभणीत काल जोरदार सरी बरसल्या. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola