Maharashtra Rain: शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळणार,बीडचे पालकमंत्री Dhananjay Mundeयांची माहिती
बीड जिल्ह्यामध्ये कधी नव्हे एवढे मोठे संकट व टाकले आहे यातून प्रशासनाने लोकांना सहीसलामत बाहेर काढण्यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न केले आणखीही प्रशासनाचे प्रयत्न चालू आहेत यात सगळ्यात मोठे नुकसान हे शेतकऱ्यांचा झालय आणि पशुधन वाहून गेले आहे त्यामुळे आता पंचनामे किंवा टक्केवारी ठरवली जाणार नाही तर शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण नुकसान भरपाई देण्याची आम्ही तयारी केली आहे असं मत बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
मांजरा काठावर असलेल्या देवळा या गावातील आणखी बरेच लोक शेती वस्तीवर अडकून पडलेत त्याच ठिकाणी पाणी काढण्यासाठी धनंजय मुंडे पोहोचले होते यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी सांगितले की बीड जिल्ह्यातील एकूण झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटना आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना अवगत केलेले आहेत प्रशासन बारकाईने सगळ्या गोष्टीवर ती लक्ष ठेवुन आहे लवकरच शेतकऱ्यांना रिलीफ मिळावा यासाठी नुकसान भरपाई देऊ सोबत सुद्धा यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.