Electricity Employee Strike | वीज कर्मचाऱ्यांचा 72 तासांचा संप, राज्यावर वीज संकटाची शक्यता
Continues below advertisement
राज्यातील तीनही वीज कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचारी मध्यरात्रीपासून बाहत्तर तासांच्या संपावर गेले आहेत. सरकारने Essential Services Maintenance Act (MESMA) लागू करत हा संप बेकायदेशीर ठरवला आहे. संपामुळे पुढील तीन दिवस राज्यातील वीज यंत्रणेची जबाबदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर असेल. राज्यात अनेक प्रमुख शहरांमध्ये वीज वितरणाची समांतर जबाबदारी काही खासगी कंपन्यांना देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेला विरोध म्हणून हा संप पुकारण्यात आला आहे. कृती समितीने दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च पदावरील निवडक अधिकारी वगळता सुमारे नव्वद टक्क्यांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी संपावर आहेत. मागच्या काही दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. या परिस्थितीत वीज यंत्रणेत काही बिघाड झाल्यास, संपामुळे दुरुस्तीच्या कामात मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement