Kolhapur Strike | कोल्हापूरमध्ये MSEDCL कर्मचाऱ्यांचा खासगीकरणाविरोधात तीन दिवसीय संप सुरू
Continues below advertisement
कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या ऑफिससमोर कर्मचाऱ्यांनी संपाला सुरुवात केली आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाला तीव्र विरोध करत जोरदार घोषणाबाजी केली. संप सुरू करण्यापूर्वी कर्मचारी संघटनांनी प्रशासनाकडे काही सूचना केल्या होत्या, मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आजपासून संपाचे हत्यार उचलले आहे. कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. प्रशासनाने किंवा शासनाने दखल न घेतल्यामुळे नाईलाजाने हा संप प्रशासनाने लादला असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही, असे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. "जनतेच्या मालकीचा उद्योग हा जनतेचाच रहावा" या भावनेतून सात संघटनांनी तीन दिवसांच्या संपाची सुरुवात केली आहे. शासनाने या प्रकरणात लवकर हस्तक्षेप करून खासगीकरणाचे धोरण रद्द करावे, अशी विनंती कर्मचाऱ्यांनी केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement