Sanjay Raut : मुंबईसह महाराष्ट्र विचार आणि संघटनात्मक बांधणीने ढवळून काढणार - संजय राऊत
Continues below advertisement
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपापल्या पक्षांची बांधणी सुरू केली आहे. 'मुंबईसह महाराष्ट्र ढवळून काढणार आहोत', असा विश्वास शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या २७ तारखेला मुंबईतील उपशाखाप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत, तर दुसरीकडे राज ठाकरे यांनीही नुकतीच त्यांच्या मतदार यादीप्रमुखांची बैठक घेतली. पैशाचा वापर, भ्रष्टाचार आणि यंत्रणेच्या गैरवापराविरोधात कार्यकर्ता लढतो, असे सांगत दोन्ही पक्ष एकत्र येऊन कार्यकर्त्यांना ताकद देतील, असे संकेतही यातून मिळत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement