Maharashtra Politics: राज्यात हजारो कोटींची फसवणूक, सरकार उचलणार मोठे पाऊल
Continues below advertisement
मुंबईतील कर्नाक पुलाचे बांधकाम पूर्ण होऊनही तो वाहतुकीसाठी खुला न केल्याने ठाकरे गट आणि मनसे यांनी एकत्र येत आंदोलन केले. दुसरीकडे, शक्तीपीठ महामार्गाला विरोध केल्याप्रकरणी राजू शेट्टींसह चारशे जणांवर, तर राष्ट्रीय महामार्ग रोखल्याप्रकरणी खासदार विशाल पाटील यांच्यासह पन्नास जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मुंब्रा रेल्वे अपघात डबे घासल्यानेच झाल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. राज्यात गेल्या दहा वर्षांत मुंबई वगळून गुंतवणूकदारांची तब्बल २२,५२२ कोटी रुपयांची फसवणूक झाली असून, सायबर गुन्ह्यांतून ११,००० कोटी रुपये गमावले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकार आर्थिक गुप्तवार्ता कक्ष स्थापन करणार आहे. तसेच, राज्यातील ८,२१३ गावांमध्ये शाळा नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूरमध्ये अवैध परवान्यांवर धावणाऱ्या स्कूल व्हॅन चालकांनी नवीन स्पीड गव्हर्नरच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका चालकाने विचारले, "पंधरा हजार खर्च करुन नवीन सोळा डिजीटचे स्पीड गव्हर्नर युनिट का लावायचे?"
Continues below advertisement