Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 30 July 2025

वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावरील ईडीच्या छापेमारीचे धागेदोरे मंत्री दादा भुसे यांच्यापर्यंत जाण्याची शक्यता असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मात्र, पवार यांची नियुक्ती ठाकरे सरकारच्या काळात झाल्याचे सांगत भुसे यांनी आरोप फेटाळले. दुसरीकडे, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले आहेत. सूर्यवंशी यांच्या आईने प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले. विधानसभेत आमदार पत्ते खेळत असल्याच्या अहवालावरून रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केला, तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली. यासोबतच, परळीतील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार असल्याचे मकोका न्यायालयाचे निरीक्षण आहे. राज्यात पुढील काही दिवस पाऊस विश्रांती घेणार असून, उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola