Kirit Somaiya vs Hasan Mushrif : किरीट सोमय्या यांचा आरोप अन् हसन मुश्रीफ यांचं उत्तर ABP Majha

Continues below advertisement

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi) नेते आणि मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करण्याचा सपाटाच भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी लावला आहे. आधी अनिल परब, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड नंतर हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप लावल्यानंतर आता सोमय्या यांच्या रडारवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आले आहेत. आज कराडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. 

दरम्यान  भाजप नेते  किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांनंतर हसन मुश्रीफ यांनी तत्काळ पत्रकार परिषद घेत सडेतोड उत्तर दिलं आहे. हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधून किरीट सोमय्या, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच किरीट सोमय्यांनी केलेले सर्व आरोप पुन्हा एकदा फेटाळून लावेल. मला डेंग्यू झाला होता, आता प्रकृती स्थिर असली तरी अशक्तपणा आहे. मी किरीट सोमय्या यांचा आभारी आहे की, त्यांनी माझ्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या. गेल्या अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या जे काही आरोप करतायत, त्यामागे भारतीय जनता पक्षाचं फार मोठं षडयंत्र आहे. विशेषतः चंद्रकांत पाटील हे याचे खरे मास्टर माईंड आहेत. तसेच किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram