Eknath Shinde : ठाकरेंच्या युतीवर शिंदेचा पलटवार, 'लोक हातात टिकल्या देतील'

Continues below advertisement
ठाणे महापालिका निवडणुकीच्या (Thane Municipal Corporation elections) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ठाकरे गट आणि मनसे (MNS) एकत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावर सडकून टीका केली आहे. 'महाराष्ट्रमध्ये कुणी कितीही प्रयत्न केला, एकत्र आले, तरी त्यांच्या हातामध्ये लोक टिकल्यास देतील', अशा शब्दात शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर खोचक प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी 'दोन ठाकरे सगळ्यांच्या ठिकऱ्या उडवतील' असा इशारा दिला होता. यावर शिंदे म्हणाले की, हा 'बोलाची कडी आणि बोलाचाच भात' असा प्रकार आहे. लोकसभा आणि विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महायुतीचाच भगवा फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola