Maharashtra Politics: 'विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला १ लाखाचं बक्षीस', शेतकरी नेते बच्चू कडूंची वादग्रस्त घोषणा

Continues below advertisement
काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाविकास आघाडीतील (MVA) घटक पक्षांना सूचक इशारा दिला आहे, तर दुसरीकडे शेतकरी नेते बच्चू कडू यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करत एक वादग्रस्त घोषणा केली आहे. 'विखे पाटील यांची गाडी फोडणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षिसं जाहीर करून दिली', असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी 'एकला चलो'चा नारा देत आघाडी केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीवर अवलंबून नसल्याचे म्हटले आहे. मनसेच्या (MNS) संभाव्य आघाडीतील समावेशाचा निर्णय राष्ट्रीय पातळीवर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या १२ नोव्हेंबरला आघाडीच्या भवितव्याबद्दल अधिक स्पष्टता येईल, असे संकेत मिळत असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola