Voter Fraud : '‘चोर मुख्यमंत्री’ टीकेनंतर वाद, फडणवीसांना प्रत्युत्तर

Continues below advertisement
मतचोरीच्या (Voter Fraud) मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर केलेल्या टीकेला, ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना, 'जो माणूस मतांची चोरी करून मुख्यमंत्री झालाय, ते चोमू आहेत, महाराष्ट्राला चोमू मुख्यमंत्री लाभलेले आहेत' असे म्हटले आहे. आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने खुलासा करायला हवा असताना मुख्यमंत्री का उत्तर देत आहेत, असा सवाल अनिल परब यांनी विचारला. 'त्यांना एवढी मिरची का लागली आहे?', असेही परब म्हणाले. निवडणूक आयोगाच्या कारभाराला आव्हान दिलेले असताना मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्याची गरज नव्हती, असेही विरोधकांनी ठणकावले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola