Maharashtra Police Bharti | पोलिसांची बंपर भरती होणार, 15 हजार पदांच्या भरतीला मंत्रिमंडळाची मंजुरी!
राज्यातील तरुणांसाठी मोठी बातमी. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये १५ हजार पदांच्या भरतीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. यामुळे अनेक महिन्यांपासून भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी भरती प्रक्रिया लांबणीवर पडल्याने उमेदवारांमध्ये नाराजी होती, मात्र आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ही प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे. या भरतीमध्ये पोलीस शिपाईची १० हजार ९०८ पदे, पोलीस शिपाई चालकची २३४ पदे, बँडमनची २५ पदे, सशस्त्र पोलीस शिपाईची २ हजार ३९३ पदे आणि कारागृह शिपाईची ५५४ पदे भरली जाणार आहेत. २०२२ ते २०२३ मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही अर्ज करता येणार आहे. २०२४ ते २०२५ मधील रिक्त पदांचा आढावा घेऊन ही भरती प्रक्रिया राबवली जाईल. लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर केला जाईल.