Buldhana : 112 - पोलिसांचा नवा हेल्पलाईन नंबर; अवघ्या दहा मिनिटांमध्ये मिळणार मदत

Continues below advertisement

24 तास आणि वर्षाचे 365 दिवस जनतेच्या सुरक्षेसाठी कार्यतत्पर असणाऱ्या पोलीस विभागाकडून नागरिकांना यापेक्षाही जलद आणि तात्काळ मदत मिळावी यासाठी पुन्हा एक पाऊल पुढे टाकले आहे. जनतेच्या सेवेसाठी 100 या हेल्पलाइन नंबरला पर्याय म्हणून 112 हेल्पलाईन नंबर कार्यान्वित करणार करण्यात आला आहे, हा एकच नंबर संपूर्ण राज्यभरात कार्यान्वित असणार आहे. 112 या हेल्पलाइन नंबर वर एखाद्या नागरिकाने संपर्क करून मदत मागितल्यास तो कॉल तात्काळ ट्रेस होऊन दहा मिनिटात मदत पोहचविण्याचा प्रयत्न पोलिस विभागाकडून केला जाणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात 112 हेल्पलाइन नंबर ची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून पोलिस नियंत्रण कक्षामार्फत हे सर्व हाताळली जाणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram