पालघरच्या दाभोसा धबधब्याचं थक्कं करणारं रुप, जव्हार तालुक्यातील पर्यटनस्थळं सौंदर्याने बहरली

जव्हार तालुक्यापासून  20 किमीवर असलेल्या डोंगराच्या कुशीत वसलेला हा दाभोसा धबधबा!  धबधब्याची उंची किमान 300 फुट. सध्या पर्यटकांची गर्दी या दाभोसा गावी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पालघर जिल्ह्यासह मुंबई तसंच गुजरात ,नाशिक आणि सिल्वासामधून मोठ्या प्रमाणावर पर्यटक या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. या धबधब्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा धबधबा बाराही महिने सुरू असल्याने पावसाळा नसतानाही पर्यटकांना या पर्यटन स्थळाचा आनंद घेता येतो. मात्र वर्षाऋतुत धबधब्याबाजूला असलेली हिरवाई दिसत असल्याने या दाभोसा धबधब्याचं सौंदर्य अधिक खुलुन दिसते आणि यामुळे पर्यटक पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर येथे येताना पाहायला मिळतात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola