Election Commision: निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीय एल्गार, १ नोव्हेंबरला मुंबईत मोर्चा
Continues below advertisement
महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, १ नोव्हेंबर रोजी मुंबईत विराट मोर्चाची हाक दिली आहे. शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'निवडणूक आयोगाच्या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध सर्वपक्षीय विराट मोर्चा निघेल,' असा थेट इशारा दिला. सेनाभवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत, मतदार याद्यांमधील घोळ आणि बोगस मतदार नोंदणीचे पुरावे देऊनही आयोग कारवाई करत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. या मोर्चात शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस (SP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेस नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे देखील सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मोर्चाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न करणार असल्याचे विरोधी पक्ष नेत्यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement