Maharashtra Onion Farmer : सर्वपक्षीय नेत्यांनो कांद्याबाबत तुमची भूमिका जाहीर करा : भारत दिघोळे
Continues below advertisement
केंद्र सरकारने कांद्याचं निर्यातशुल्क वाढवून तब्बल ४० टक्क्यांवर नेल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झालेत. सरकारच्या या निर्णयामुळे कांद्याच्या निर्यातीत घट होणाऱेय. यामुळे पुढील काळात किरकोळ बाजारात कांद्याचे दर घटण्याची भीती व्यक्त होतेय. म्हणूनच केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात आणि निषेधार्थ आजपासून नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्या बेमुदत काळासाठी बंद राहणार आहेत. नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनच्या लालसगावमधील बैठकीत हा निर्णय झालाय. खरंतर कालपासूनच अनेक ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालीय.
Continues below advertisement