Maharashtra Onion : केंद्राने रविवारी कांद्याचा बफर स्टॉक तीन लाख टनांवरून पाच लाख टनांपर्यंत वाढवला
Continues below advertisement
कांद्याबाबत महत्त्वाची बातमी आहे. केंद्राने रविवारी कांद्याचा बफर स्टॉक तीन लाख टनांवरून पाच लाख टनांपर्यंत वाढवला आहे. NCCF मार्फत आजपासून २५ रुपये प्रति किलो दरानं कांदा विकण्यात येणार आहे. बफर स्टॉकमधून कांद्याची विल्हेवाट लावण्यास केंद्र सरकारनं सुरुवात केली आहे. जेथे किरकोळ किमती अखिल भारतीय सरासरीपेक्षा जास्त आहेत, अशी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रमुख बाजारपेठांमध्ये NCCF मार्फत कांदा विकण्यात येणार आहे. आजपर्यंत, बफरमधून सुमारे चौदाशे टन कांदा बाजारपेठेत पाठवले गेला आहे
Continues below advertisement