Chandrapur : चंद्रपुरात अधिकृत दारु विक्री सुरु ; उत्पादन शुल्क विभागाकडून परवाने जारी
चंद्रपूर जिल्ह्यात दारू विक्रीला सुरुवात झाली आहे. दुपारी दारुची खेप चंद्रपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या दुकानात पोहचायला सुरुवात झाली आणि त्यानंतर लगेच दारूविक्रीला सुरुवात झाली. यावेळी लोकं मोठ्या प्रमाणात दारू घेण्यासाठी गर्दी करतांना दिसले. जिल्ह्यात आज एकूण 98 दारूच्या परवान्यांना परवानगी देण्यात आली असून यामध्ये 1 वाइन शॉप, 64 बार, 1 क्लब, 6 बियर शॉपी आणि 26 देशी दारू विक्री दुकानांचा समावेश आहे.