Maharashtra October Heat : महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटच्या झळा,उत्तरेकडी काही राज्यांमध्ये थंडीची चाहूल
देशभरातून मॉन्सून परतीच्या मार्गावर आहे. अनेक राज्यातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याने उत्तरेकडील काही राज्यात थंडीची चाहूल लागली आहे.तर महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवत आहे. मुंबई, पुण्यात पावसाने विश्रांती घेतल्याने तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यात उकाडा जाणावत आहे.