Maharashtra News ; राज्य सरकारमधील गट क मधील लिपिक पजं MPSC द्वारे भरणार

Continues below advertisement

सरळसेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गट- क मधील लिपिकवर्गीय पदे सरळसेवेने MPSCमार्फत भरण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ही मागणी करण्यात येत होती. यासाठी 10 ऑक्टोबर 2020 रोजी सामान्य प्रशासन विभाग आणि MPSC यांच्यात संयुक्त बैठक पार पडली होती, या बैठकीत प्रायोगिक तत्वावर राज्यातील सर्व लिपिक पदांची परीक्षा MPSC द्वारे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुढे याला अंतिम मान्यता मिळण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी गेला. आणि आज 2 नोव्हेंबर 2022 रोजी शासन निर्णय प्रसिद्ध होऊन एक महत्वाचा निर्णय झाला, नजीकच्या काळात सर्व परीक्षा या MPSC च्या कक्षेत येतील. सुरवातीपासून विविध माध्यमातून 2019 पासून केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर सर्व पदांची (गट अ ते गट क) पदभरती MPSC द्वारे करण्यात यावी यासाठी विद्यार्थी पाठपुरावा करत होते. यातील एक टप्पा आजच्या निर्णयाने यशस्वी झाला आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram