BJP Maha Politics: महापालिका निवडणूक: भाजपचा 'एकला चलो रे'चा नारा, युतीत बिघाडी?
Continues below advertisement
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. 'आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढू,' असा आग्रह भाजप पदाधिकाऱ्यांनी फडणवीसांसमोर केल्याची माहिती आहे. कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांनी तर 'एकला चलो रे'ची तयारी दाखवली आहे. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्ला दिला असला तरी, ठाण्यातील शिंदे आणि भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्यातील वाद बैठकीत मांडण्यात आला. दोन्ही नेत्यांनी निवडणुका युतीतून लढण्याची तयारी दाखवली असली तरी, स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या भावनांमुळे जागावाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement