Maharashtra : बळीराजा संतप्त, सरकार एकीकडून मदत करतं, दुसरीकडून हिरावून घेतं का? ABP Majha

Continues below advertisement

एकीकडे शेतमालाला हमी भाव मिळत नाही, तर दुसरीकडे  अतिवृष्टीने हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. अशात आता सरकार पण शेतकऱ्यांची परीक्षा घेतंय का?, असा सवाल विचारला जातोय. कारण एकीकडे राज्य शासनानं अतिवृष्टीमुळ झालेल्या नुकसान भरपाई म्हणून काही रक्कम देऊ केली. आणि दुसरीकडे वीजबिल भरलं नाही म्हणून सरसकट विजेचं कनेक्शन कापलं जातंय. त्यामुळे पिकांना पाणी कसं द्यायचं, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा राहीलाय. त्यातच ३ एचपी मोटरसाठी १० हजार तर ५ एचपी मोटरसाठी १५ हजार भरण्याचीही महावितरणकडून सक्ती केली जात असल्याचं बळीराजा सांगतोय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram