Maharashtra Monsoon Updates : पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्यांना दिलासा नाही

Continues below advertisement

Maharashtra Monsoon Updates : अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्यानं अगदी हैराण केलं आहे. अशातच सर्वचजण पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. पण, राज्यात मात्र अद्यापही उष्णतेची लाट (Heat Wave) जाणवत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे तब्बल तीन दिवसांपासून मान्सून (Monsoon) कर्नाटकमधील (Karnataka) कारवारमध्येच रेंगाळला आहे. दरम्यान, राज्यात विदर्भ, मराठवाडा उत्तर महाराष्ट्रासह इतरही अनेक भागांत तापमान सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या राज्यातील बहुतांश नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाच्या चटक्यांचा त्रास सहन करावा लागणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram