Maharashtra Monsoon Session : 31जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार; अजित पवारांची मोठी घोषणा

Continues below advertisement

मुंबई : स्वप्नील लोणकरची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी घटना आहे, राज्यात यापुढे अशा कोणत्याही घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 31 जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा विधानसभेत केली. 

राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. त्याचा फटका सर्वांनाच बसला. स्वप्नील लोणकरची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. लोणकर कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. राज्यात यापुढे अशी घटना घडणार नाही या संदर्भात आम्ही काळजी घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 

अजित पवार पुढे म्हणाले की, "काल कॅबिनेटमध्ये एमपीएससीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. एसईबीसी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर एमपीएससीची प्रक्रिया थांबवावी लागली. आता येत्या 31 जुलैपर्यंत राज्यात एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरण्यात येतील त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही." 

एमपीएससी ही संस्था स्वायत्त असल्याने त्यामध्ये जास्त हस्तक्षेप करता येत नाही असं सांगत अजित पवार म्हणाले की, सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर आम्ही या विषयावर आज पुन्हा चर्चा करणार आहोत.

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram