Maharashtra Monsoon : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, 11 जूनपर्यंत राज्य व्यापणार! ABP Majha

Continues below advertisement

Vidarbha Weather Update नागपूर : गेल्या काही दिवसांपासून वाढलेले तापमान आणि उकड्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले असून आता साऱ्यांना पावसाची आतुरता लागली आहे. एकीकडे  मान्सूनची (Monsoon Has Arrived In India) चाहूल लागली असताना नैर्ऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम  विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तसेच येत्या 10 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, त्यापूर्वीच राज्यात मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

हवामान विभागाने दिलेले अंदाजानुसार विदर्भातही  (Vidarbha) दमदार पावसाने एंट्री करत एकच दाणादाण उडवली आहे. तर आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील (Vidarbha) जवळ जवळ सर्व जिल्ह्यांना नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याचा अंदाजही हवामान विभागाकडून (IMD) वर्तविण्यात आला आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram