Maharashtra Monsoon : राज्यात 23 जूननंतर पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

Continues below advertisement

बुलेटिनची सुरूवात करूया, तापलेल्या भवतालात ओलावा पेरणाऱ्या बातमीने... उशिरा का होईना, पण महाराष्ट्रात येत्या २३ तारखेनंतर अर्थात येत्या शुक्रवारनंतर पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. खरंतर, एरवी ७ जूनला येणाऱ्या पावसाने, यंदा मात्र जूनचा शेवटचा आठवडा आला तरी ओढ दिलीय. त्यामुळे, महाराष्ट्रातील धरणांनी एव्हाना तळ गाठलाय. आणखी काही दिवस पाऊस रुसलेलाच राहिला तर, महाराष्ट्रापुढे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहू शकतो. सोबतच, अंगाची लाहीलाही करणारा उकाडा, उष्ण वारे आणि उन्हाची काहिली यामुळे, नागरिक हैराण झालाय.
शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. आणि ज्यांनी पेरण्या केल्यायत त्यांच्यावर दुबार पेरणीची टांगती तलवार आहे. त्यातच आता हवामान विभागाने २३ जूनला पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. ही दिलासादायक गोष्टय. दरम्यान, यंदा सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आलीय. आणि जूनच्या शेवटच्या आठ ते दहा दिवसांत राज्यात चांगला पाऊस असेल, आणि २१ जूनपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram