Maharashtra Monsoon News : तुमच्या जिल्ह्यातील पावसाच्या बातम्या एका क्लिकवर : 12 जून 2024

Continues below advertisement

पुणे .. पुण्यातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची रिपरिप. हवामान विभागाकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट.

धरण क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम, मुंबईतल्या धरणांतील पाणीसाठा ६ टक्क्यांच्या खाली, पुढीचे काही दिवस पाणी जपून वापरावं लागणार.

रायगडच्या म्हसळा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी, पेरणीनंतर आता शेतीच्या कामांना वेग मिळणार असल्यामुळे  बळीराजा सुखावला. 

लातूरच्या रेणा मध्यम प्रकल्पात 20 ते 22 टक्के पाणीसाठ्यात वाढ,  नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा,  मागील 11 दिवसात लातूर जिल्ह्यात 136 मिलीमीटर पावसाची नोंद.

हिंगोली जिल्ह्यात काल पहिल्यांदाच वादळी वारे आणि  विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला. जिल्ह्यातील कयाधू नदी प्रवाहित. 

तूफान पावसामुळे सांगोला तालुक्यातील कोरडी पडलेली माण आणि अपृका नदी प्रवाहीत,  मोडलिंब येथील वेताळबाबा ओढा ओव्हरफ्लो. ((सांगोला हा कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो.))कोरडे पडलेल्या अनेक बंधाऱ्यानाही आलं पाणी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram