Latur Rain : लातूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे : जिल्हाधिकारी

Continues below advertisement

लातूर जिल्ह्यात मागील बारा तासापेक्षा जास्त काळ होत असलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे ..प्रशासन यावर लक्ष ठेवून आहे ..नागरिकांनी अति महत्वाचे काम असेल तर बाहेर पडावे ..कारण येत्या काही तासात पावसाचा अंदाज हवामान खात्यांनी व्यक्त केला आहे ..प्रशासनाकडून सर्व खबरदारी घेतली जात आहे..नदी काठच्या गावांनी सतर्कता बाळगावी ..पाण्यात उतरून नको ते धाडस करू नये ..पाण्यात ज्यांची पिके गेली आहेत त्यांचे पंचनामे लवकरात लवकर करण्यात येणार आहेत ..नुकसानभरपाई प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल ...नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे...पूरपरिस्थिती बाबत मदत लागली तर 223 002 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram