ABP News

Maharashtra Monsoon : राज्यात पुढील 4-5 दिवस सर्वदूर पावसाचा अंदाज, भारतीय हवामान विभागाची माहिती

Continues below advertisement

आता बातमी आहे, पावसाची... गेल्या काही दिवसांत लपाछपीचा खेळ करणारा पाऊस पुन्हा येणारेय... महाराष्ट्रात पुढील ४-५ दिवस सर्वदूर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १५ ते १८ सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलीय. तसेच, विदर्भात देखील पुढील ४ दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर, मराठवाड्यात पुढील २-३ दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. दरम्यान, मुंबई, ठाण्यात १६, १७ आणि १८ सप्टेंबर रोजी सर्वत्र पाऊस सक्रिय होणार असून, मुंबईत १८ सप्टेंबरला काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram