Maharashtra Monsoon : पुढच्या 3 दिवसात मान्सूनच्या आगमनाची शक्यता

Continues below advertisement

राज्यातलं आगमन लांबलेल्या मान्सूनला येत्या काही दिवसांत पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे. कारण मोसमी वाऱ्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सध्या पोषक वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळं येत्या तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळं यंदा मान्सूनचं महाराष्ट्रातलं आगमन लांबणीवर पडलं होतं. पण मान्सूनला पुढे सरकण्यासाठी लागणारं अनुकूल वातावरण आता तयार झालं आहे.  त्यामुळं राज्याच्या काही भागांमध्ये आपल्याला उद्यापासून हलक्या स्वरूपाचा पाऊस बुधवारपासून पाहायला मिळेल. येत्या २३ जूनपासून राज्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. हा पाऊस जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सलग सुरु राहण्याची शक्यता आहे. तसंच यंदा पाऊस ऑक्टोबरपर्यंत राज्यात राहण्याची शक्यता आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram