Maharashtra Monsoon 2022 : मान्सून कर्नाटक आणि गोव्यात्या सीमेवरच रेंगाळला ABP Majha
Continues below advertisement
यंदा मान्सून वेळेआधी दाखल होणार असं हवामान विभागानं छातीठोकपणे सांगतिलं... म्हणून तुम्ही छत्र्या आणि रेनकोटही बाहेर काढले असतील... मात्र आता त्याच छत्रा-रेनकोट पुन्हा एकदा कपाटात ठेवण्याची वेळ आलीय..कारण मान्सूनं हवामान खात्याला चांगलंच तोंडघशी पाडलंय... कर्नाटकात दाखल झालेला पाऊस, कारवार, चिकमंगळूर या कर्नाटक-गोवा सीमाभागात रेंगाळलेला आहे... मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास १२ ते १३ जून च्या आसपास मान्सून राज्यात येण्याची शक्यता आहे... सध्या कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागात ढगाळ वातावरण असल्यानं उकाडा चांगलाच वाढलाय... तर विदर्भात उ्ष्णतेची लाट कायम आहे... काही भागात पुढील दोन-तीन दिवसात मान्सूनपूर्व सरींचाही अंदाज वर्तवण्यात आलाय.
Continues below advertisement