Maharashtra Monsoon 2022 : राज्यभर मुसळधार, 'या' जिल्ह्यातील शाळा बंद ABP Majha

Continues below advertisement

पुढील ४८ तास राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. अनेक जिल्ह्यांना रेड अलर्टही देण्यात आलाय.  त्यासाठी आता प्रशासनानं सावधगिरीची पावलं उचललीएत... जिथं रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तिथं शाळांना सु्ट्टी देण्यात आलीए. त्यामुळे आज ठाणे पालघर,रायगड  जिल्ह्यात शाळा बंद राहणार आहेत. तर पुणे जिल्ह्यातल्या शाळा १७ जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. शाळांप्रमाणे मुंबई विद्यापीठानंही आज होणाऱ्या परीक्षा रद्द केल्या आहेत आणि लवकरच परीक्षांची नवी तारीख जारी करण्यात येईल असं विद्यापीठानं सांगितलंय. मात्र मुंबईच्या शाळांबाबत कोणताच निर्णय झालेला नाहीये.  तिकडे पुणे आणि नवी मुंबईत खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिलेत.. पुण्यात सर्वच खासगी कंपन्यांना पुढचे दोन दिवस घरुनच काम करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram