Maharashtra Monsoon 2022 : येत्या 5 दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
येत्या ५ दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे... अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग वाढल्यानं राज्यात पावसाचा जोरही वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टीसह इतर काही भागात वादळी वाऱ्याची शक्यता आहे. मुंबई आणि ठाण्याातही हा वीकेंड मुसळधार पावसाचा असू शकतो असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.