Chhagan Bhujbal Health: छगन भुजबळांवर हृदय शस्त्रक्रिया यशस्वी, प्रकृती स्थिर
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या प्रकृतीसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये (Asian Heart Institute) यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 'शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला छगन भुजबळ यांना दिला असून, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी त्यांना पुढील काही दिवस कोणालाही भेटता येणार नाही,' अशी माहिती भुजबळ यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली. सध्या छगन भुजबळ यांची प्रकृती स्थिर असून ते लवकरच पूर्णपणे बरे होऊन आपल्या कामात पुन्हा सक्रिय होतील, असेही सांगण्यात आले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement