Ministers Bunglow EXCLUSIVE : मंत्र्यांचे बंगले उधळपट्टीचे इमले; PWD विभागातली अनागोंदी चव्हाट्यावर

Continues below advertisement

कुणालाही हेवा वाटावा अशी राज्यातल्या मंत्र्‍यांची मुंबईत आलिशान  कार्यालयं आणि सरकारी बंगले आहेत. सध्या इथली लगबग कमी झालीय, कारण तोंडावर आलेल्या निवडणुका...मंत्र्‍यांचा राबता सध्या कार्यालयात कमी आणि आपापल्या मतदारसंघात जास्त आहे...येत्या काही महिन्यांत नवीन सरकार अस्तित्वात येईल...पण राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला मात्र या कशाचीच फिकीर नसल्याचं दिसतंय...कारण आधीच सुस्थितीत आणि काही महिन्यांपूर्वीच नूतनीकरण केलेल्या बंगल्यांचं पुन्हा नूतनीकरण करण्याचा घाट घालण्यात आलाय...त्यासाठी कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढले जातायत...
विशेष म्हणजे अवघ्या चार महिन्यांपूर्वी यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेत...गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ३० कोटींचं काम करण्यात आलं होतं, त्यात गैरव्यवहाराचा आरोप झाला होता...त्याची अजून चौकशी सुरू असतानाच पुन्हा एकदा कागदोपत्री कामं दाखवून कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढल्या जातायत...जनतेच्या पैशाचा सरकारकडून मंत्र्यांच्या बंगल्यांवर चुराडा होतोय...सार्वजनिक बांधकाम विभागातला हा अनागोंदी कारभार एबीपी माझानं चव्हाट्यावर आणलाय...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram