Maharashtra Temperature : राज्यात थंडी पडणार? कोरड्या हवामानामुळे किमान तापमानात घट होण्याची शक्यता
राज्यभरात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार आहे. कोरड्या हवामानामुळे किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. राज्यातील किमान तापमानात सरासरी दोन अंश सेल्सिअसने घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात काल राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद सांताक्रूझ इथे ३६.६ अंश सेल्सिअस इतकी झाली आहे, तर औरंगाबाद १४.८ येथे सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली आहे.