Maharashtra Rain : राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
Continues below advertisement
राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. कोकण, मध्य महाराष्ट्र, पुणे, मराठवाड्याच्या दक्षिण भागात पावसाचा इशारा देण्यात आलाय. तसंच काही ठिकाणी हलक्या सरी बरसण्याचाही अंदाज वर्तवण्यात आलाय. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची शक्यता आहे. तसंच उत्तर पूर्व परिसरात हवेचा दाब वाढल्याने राज्यात किमान तापमानात मोठी घट झालीय. वातावरणातील बदलामुळे राज्यात पावसाची स्थिती निर्माण झालीय.
Continues below advertisement