Matheran च्या Mini Train ची झुकझुक आंतरराष्ट्रीय पातळीवर? UNESCO ने माथेरान रेल्वेची माहिती मागवली
Continues below advertisement
Matheran च्या Mini Train च्या झुकझुकची चर्चा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर होताना दिसत आहे. UNESCO ने माथेरान रेल्वेची माहिती मागवली आहे. पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणारी माथेरानची मिनी ट्रेन युनेस्कोच्या यादीत येण्यास सज्ज झालीय. 'युनेस्को ग्रीस मेलिना मर्कोरी' या पुरस्कारासाठी माथेरानच्या मिनी ट्रेनचं नामांकन पाठवण्यात आलंय. त्यामुळे माथेरानच्या मिनी ट्रेनची झुकझुक आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही ऐकू येणार आहे. पर्यटकांमध्ये देशभरातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्यांबरोबरच विदेशातील पर्यटकांचाही समावेश असतो. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी व्हिस्टाडोम कोचही यात बसवण्यात आलाय.
Continues below advertisement